आधुनिक संणाची नांदी
साधुसंत येती घरा/ तोचि दिवाळी दसरा / असे सुवचन अमलात आणणारी आपली पूजनीय ,महनीय संस्कृती आहे.आपली संस्कृती नैतिक मूल्ये विविध सणाद्वारे सहजपणे रुजविले जातात व अमलातही आणले जातात.पण काळानुरूप सणाचे स्वरूप बदलत आहे हे मात्र खरे !
प्रातकाली उठून शेणसडा,रांगोळी ,पूजाअर्चा एकत्र येवून फराळ ,नाष्ट्याचा आस्वाद घेणे ,.एकमेकांच्या घरी जावून शुभेच् देणे अशा अनेक लहान पण मौल्यवान क्षण काळाच्या ओघात दुरावत आहे .वेळ नाही,गडबड,फास्ट लाईफ ,मोबाईल,whatappवर शुभेचछचा कृत्रिम एकच संदेश कोरडेपणाने सर्वत्र फिरवला की कामच झाले .मग त्यात प्रेमाचा ओलावा नाही ,मायेचा स्पर्श नाही .हा पण मोबाईलचा टच असतो .मोठमोठ्या दुकानात जावून खरेदी ,रेडीमेड फराळाची लयलूट होते.
दसऱ्याला सोने ,संध्याकाळी एकत्र भावडनि ,मित्र मैत्रिणीनी आप्तजनांना जाऊन देणे ,आशीर्वाद घेणे तो ही एक कनकमय क्षण ! पण सुवर्ण महागले अन मोबाईल संदेश नात्यात स्वस्त झाले .पैशातून सणाचे प्रदर्शन केले जाते.रांगोळीचे तर रेडीमेड छप दरवाज्यासमोर काढले जातात.कुठे ती कलाकुसर ,रंगसंगतीतील एकरूपपणा हरवून बसला आहे .तासनतास रांगोळी काढून त्यात रंग भरणे ती मजा ,तो आनंद विरळाच !
एकीकडे सणाचे मूळ स्वरूप बदलून प्रदर्शनी,चढओडीचे स्वरूप आले आहे .लाखो रुपये खर्च करून दहीहंडी उंचावर बाधल्या जातात.परतु सणातून खर्चिक चढओढ सांगितलीच नाही आहे .त्यात तर हेच बिबवले आहे की ,कृष्णाने शिकाल्यावरील दहीलोणी खाण्यासाठी मित्रांना सोबत घेवून मित्रांच्या पाठीवर उभे राहून दूधदह्याचे आस्वाद घ्यायचे .मग घरातील शिंकाळ आता जीवघेण्या स्पर्धेत एवढे उंच का अन कधी गेले ?
एकीकडे डोळे दिपवणारा विद्युत रोषणाईचा प्रकाश तर दुसरीकडे आकाशातील चंद्राचा ,चुलीतील जळत्या लाकडांचा प्रकाश म्हणजे दिवाळी.कष्टाची दिवाळी अन शांत झोपेचा सुखद फराळ सोबत असतो.तिमिरातून तेजाकडे नेणारा दिवाळी सण आता वेगळ्याच वाटा धुंडाळत आहे.
उठा उठा अभ्य्गस्नानाची वेळ झाली ही जाहिरात आपल्याला आवडते .पण आताच्या बदलत्या समाजव्यवस्थेत हे चित्र दिसते का ?उटण्याऐवजी महागडे साबण आणून स्नानाचा आनंद !फक्त बंद घराच्या चौकटीत मी व माझे त्रिकोणी ,चौकोनी कुटुंब ! शेजारी निदान पणती तरी तेवते का हेसुद्धा माहीत नसते .
सणवार म्हटले की ,व्रतवैकल्ये आलीच .उपवासाचे पदार्थ खाऊन पोट समाधान अन दुसरीकडे गरिबांना अन्न न मिळाल्याने निसर्गतः उपवास (पोटात भूक ) घडतो.मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा सणाचा नैतिक संदेश आपणा स्वार्थी वागण्यात विसरून बसलो आहोत .
गणेशोत्सव.मंगळागौर ,हळदीकुंकू अशा अनेक सणाना महिलांनी एकत्र येवून फुगडी,झिम्मा खेळावे,एकत्र यावे ,विचारांची देवाणघेवाण होते ,व्यायामही होतो .पण आता करीयर,जिम खुले असताना क्वचित ठिकाणी महिला हे पारंपारिक खेळ जोपासताना दिसून येतात.गणेशोत्सव टिळकांनी एकोपा.जनजागृतीसाठी सुरु केला ,असे असताना आता मात्र तेथे रात्र न रात्रभर पत्त्यांचे डाव रंगताना दिसतात.
सण आपल्यला निसर्गाकडे जा असे म्हणत असताना आपण निसर्गापासून दूर पळतो.नाताळत सांताक्लाज येवून मुलांना खेळणी देतो.पण आताची मुले खेळणी ,मैदानातपेक्षा मोबाईलवर ,इटरनेटवर जास्त रमतात.अन आरोग्य बिघडवून घेतात .सणातून संस्कार ,मुल्ये रुजविले जातात.आताच्या पिढीकडून दुसरया पिढीकडे संस्काराची शिदोरी सणातून पुढे सुपूर्द करायची असते .असे असताना सर्वत्र स्वरूप बदलेले आहे ,पण काळानुरूप बदलत जावे हे नक्की पण सणातून जोपासला जाणारा स्नेहाचा ओलावा हवाच .झगमगणारा देखावा ,कोरडेपणा नकोच नको .
सणाद्वारे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून वडाची फांदी तोडण्यापेक्षा ,मानवरूपी सत्यवानासाठी झाडे लावून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अमलात आणले तर सर्वत्र आनदांचे डोही आनंद तरंग ........
सौ.ऋतुजा रविंद्र गवस.
नवी मुंबई
8652433223
No comments:
Post a Comment